नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील मधळ्या फळीतील फलंदाज आणि मिस्टर आयपीएल म्हणून लोकप्रिय असलेला सुरेश रैना पुन्हा एकदा बाप झाला आहे. सुरेश रैनाची पत्नी प्रियांकाने सोमवारी एका मुलाला जन्म दिला. याआधी त्यांना एक मुलगी आहे. तिचा जन्म २०१६ मध्ये झाला होता. रैनाने मुलीचे नाव ग्रेसिया रैना असे ठेवले होते. वाचा- क्रीडा पत्रकार @BoriaMajumdar यांनी सुरैश रैनाला मुलगा झाल्याबद्दलच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वडील झाल्याबद्दल सुरेश रैनाला खुप खुप शुभेच्छा. आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित आणि छान आहेत. सुरक्षित आणि सुखी रहा, असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. वाचा- जगभरात सध्या करोना व्हायरसविरुद्ध लढा सुरू आहे. अशातच रैनाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. रैना मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. करोनामुळे सर्व क्रिकट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. २९ तारखेपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा देखील १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. वाचा- गेल्या वर्षी रैनाच्या गुढघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रैना प्रयत्न करत आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाची निवड होणार होती. पण आयपीएल होईल की नाही याबद्दल शंका आहे. रैना २०१८ मध्ये भारतीय संघाकडून अखेरचा खेळला होता. त्यानंतर तो गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत खेळला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U9UZs3
No comments:
Post a Comment