हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत पृथ्वी शॉ सलामीवीर म्हणून उतरेल. तर रोहीतच्या जागी संघात मयांकचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पृथ्वी आणि मयांक ही भारताची नवी सलामीची जोडी असेल; अशी घोषणा कर्णधार विराट कोहली यानं पत्रकार परिषदेत केली होती. आजच्या पहिल्या एक दिवसीय सामन्यासाठी पृथ्वी आणि मयांक या दोघांची जोडी मैदानात उतरली आणि या जोडीनं एक विक्रम रचला. एकाच वन डे सामन्यात पदार्पण करणारी ही भारताची चौथी जोडी ठरली आहे. विशेष म्हणजे १९७६ नंतर असा विक्रम रचणारी पृथ्वी आणि मयांक यांची दुसरी जोडी ठरली आहे. यापूर्वी १९७४ मध्ये सुनील गावस्कर आणि एस नाईक यांनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विक्रम रचला होता. असा विक्रम रचणारी ही पहिली जोडी ठरली होती. त्यांनतर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात १९७६मध्ये पार्थसारथी शर्मा आणि दिलीप वेंगसकर यांनी एकत्र पदार्पण करून हो रेकॉर्ड केला. तर २०१६ साली झिम्बाब्वेविरुद्ध लोकेश राहुल आणि करुण नायर हे फलंदाज सलामीला आले होते. दरम्यान, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी पृथ्वीचा देखील संघात समावेश करण्यात आला. रोहित जखमी झाल्यामुळं वनडे आणि कसोटी संघातून बाहेर पडला. यामुळं पृथ्वीला संधी मिळाली. अर्थात रोहितच्या जागी संघात मयांकला घेण्यात आलं आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37XDtfa
No comments:
Post a Comment