लाहोर: भारताचे पंतप्रधान यांचा कल नकारत्मकतेकडे झुकलेला असल्यामुळे जोपर्यंत ते सत्तेत आहेत तोपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच सुधारणार नाहीत, असे मत पाकचा माजी क्रिकेटपटू याने व्यक्त केले. वाचा- जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत. तोपर्यंत मला वाटत नाही की भारताकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. सर्व भारतीय मोदींप्रमाणेच विचार करतात आणि मोदींचा कल नकारत्मकतेकडे झुकलेला आहे. भारत-पाकिस्तान पुन्हा सुरू होणार का प्रश्नावर पाकच्या माजी क्रिकेटपटूने हे मत एका मुलाखतीत व्यक्त केले. वाचा- भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संबंध खराब झाले आहेत ते फक्त एका व्यक्तीमुळे आणि आम्हाला तसे नको आहेत, असे आफ्रिदी म्हणाला. वाचा- दोन्ही देशातील नागरिकांना एकमेकांच्या देशात प्रवास करायचा आहे. मला समजत नाही की मोदींना नेमक हवं तरी काय? त्यांचे धोरण आहे तरी काय, असा सवाल आफ्रिदीने विचारला. भारत-पाकिस्तान यांच्यात २०१३ पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. २०१३ मध्ये पाकिस्तान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. वाचा- काही दिवसांपूर्वी आफ्रिदीने त्याला पाचवी मुलगी झाल्याचे सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा पाकिस्तानच्या युझर्सनी त्याला प्रचंड ट्रोल केले होते. (वाचा संबंधित बातमी- ) आता मोदींसंदर्भात वक्तव्य करून तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37Z3UjN
No comments:
Post a Comment