Ads

Friday, February 28, 2020

दुसऱ्या कसोटीत इशांत शर्माला त्रिशतक करण्याची संधी!

ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतीय संघाचा स्टार जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरू शकतो. शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे आवश्यक आहे. पहिल्या कसोटीत भारताचा १० विकेटनी पराभव झाला होता. आता दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताला १-१ अशी बरोबरी करावी लागणार आहे. वाचा- दुसऱ्या कसोटी सामन्यात इशांत शर्माला एक मैलाचा टप्पा गाठण्याची संधी आहे. दुखापतीनंतर संघात परतलेल्या इशांतने पहिल्या सामन्यात शानदार कमबॅक करत ५ विकेट घेतल्या होत्या. ख्राइस्टचर्च कसोटीत इशांतने ३ विकेट घेतल्या तर त्याचा एलीट क्लबमध्ये समावेश होईल. वाचा- ३१ वर्षीय इशांतने आतापर्यंत ९७ कसोटी सामन्यात २९७ विकेट घेतल्या आहेत. आणखी ३ विकेट घेतल्यास त्याच्या ३०० विकेट पूर्ण होतील आणि अशी कामगिरी करणारा तो सहावा गोलंदाज ठरले. याआधी कपील देव, जहीर खान या जलद गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. वाचा- भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये कपील देव (४३४), जहीर खान (३११) यांच्याशिवाय फिरकीपटू अनिल कुंबळे (६१९), हरभजन सिंह (४१७) आणि आर.अश्विन (३६५) यांचा समावेश आहे. वाचा- वनडे आणि टी-२० संघातून बराच काळ बाहेर राहिलेल्या इशांतच्या नावावर कसोटीत एका अर्धशतकाचा समावेश आहे. २००७ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. तर जानेवारी २०१६ मध्ये अखेरची वनडे खेळली होती. इशांतने ऑक्टोबर २०१३ मध्ये राजकोटमध्ये अखेरची टी-२० खेळली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32B6ECY

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...