ख्राइस्टचर्च: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारताची फलंदाजी ढेपाळली. पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळी वगळता भारताची आघाडीचे फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले नाहीत. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केली. मयांकला ट्रेंट बोल्टने ७ धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर पृथ्वीने पुजारासोबत ५० धावांची भागिदारी केली. पण तो ही ५४ धावावर बाद झाला. पृथ्वी पाठोपाठ विराट कोहली ३ धावा करून माघारी परतला. तर अनुभवी अजिंक्य रहाणेला टीम साऊदीने ७ धावांवर बाद केले. राहाणे बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद ११३ अशी होती. Live अपडेट >> भारताला पाचवा धक्का, विहारी ५० धावांवर बाद >> विहारीचे अर्धशतक >> पुजारा-विहारी यांची पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी >> पुजाराच्या ५० धावा, कसोटीतील २५वे अर्धशतक >> भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे ७ धावांवर बाद >> कर्णधार विराट कोहली ३ धावा करून बाद >> पृथ्वी शॉ ५४ धावा करून माघारी परतला >> भारताला पहिला धक्का, मयांक अग्रवाल ७ धावांवर बाद, बोल्टने घेतली विकेट
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38aAQG7
No comments:
Post a Comment