नवी दिल्ली: धडाकेबाज खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू शफाली वर्मावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. १६ वर्षीय शफालीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ३४ चेंडूत ४६ धावा केल्या आणि सामनावीर पुरस्कार मिळवला. भारताच्या या लेडी सेहवागचे आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. शफालीने स्पर्धेत आतापर्यंत ३ सामन्यात ६६ चेंडूत १४४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने सलग तीन विजय मिळवत वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. भारताच्या यशात शफालीचा वाटा महत्त्वाचा होता. वाचा- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शफालीने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. पण मधळ्या फळीतील फलंदाजांनी धावा न केल्याने भारताला ८ बाद १३३ धावा करता आल्या. त्यानंतर गोलंदाजांच्या कामगिरीवर भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. आपल्या संघाने शानदार कामगिरी केली. महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरला. सामना चुरशीचा झाला पण संघाने दबाव स्विकारला आणि चांगली कामगिरी केली. शफाली वर्माला खेळताना पाहून छान वाटले. तिने पुन्हा एकदा दमदार खेळ केला, असे सचिनने म्हटले आहे. शफाली सचिनला आदर्श मानते. सचिनला पाहूनच तिने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्याचे शफालीने सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले होते. सचिनसह भारताचा माजी स्फोटक फलंदाज याने शफालीला रॉकस्टार म्हटले आहे. मुलींनी दमदार कामगिरी केली. रॉकस्टार आहे. मुलींची कामगिरी पाहून आनंद होतोय, असे सेहवागने म्हटले आहे. स्पर्धेत भारताचा अखेरचा साखळी सामना शनिवारी श्रीलंकेविरुद्ध आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2T8xv65
No comments:
Post a Comment