नवी दिल्ली: आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १७ तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा १८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. बांगलादेशविरुद्ध भारताची सलामीवीर शफाली वर्माने धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्यानंतर पूनम यादवने फिरकीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. वाचा- शफालीने पहिल्या सामन्यात १५ चेंडूत (पाच चौकार आणि एक षटकार) २९ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात १७ चेंडूत ३९ धावांचा पाऊस पाडला. यात २ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. शफालीच्या या धडाकेबाज खेळीमुळे तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशविरुद्धच्या खेळीमुळे हरियाणाच्या या १६ वर्षी क्रिकेटपटूला लेडी सेहवाग असे नाव मिळाले आहे. वाचा- बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर आयसीसीने शफालीच्या सामनावीर पुरस्कारासहचा फोटो शेअर केला आहे. शफालीने दोन सामन्यात ७ चौकार, ५ षटकारांसह ६८ धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राईक रेट २१२.५० इतका आहे. वाचा- शफालीच्या या धमाकेदार खेळीचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. युझर्स म्हणाले ही तर लेडी सेहवाग...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32og18R
No comments:
Post a Comment