वेलिंग्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर धावा करण्यात अपयशी ठरले. सलामीची जोडी अपयशी ठरल्यामुळे मधळ्या फळीतील फलंदाजांवर दबाव आणखी वाढला. आणि मयांक अग्रवाल जोडीने पहिल्या डावात १६ तर दुसऱ्या डावात २७ धावांची भागिदारी केली. पृथ्वी-मयांक जोडी अपयशी ठरल्यामुळे चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे देखील दबावात आले आणि धावा करण्यात अपयशी ठरले. पृथ्वी शॉ पहिल्या डावात १६ तर दुसऱ्या डावात १४ धावा करून माघारी परतला. मयांकचा विचार केल्यास पहिल्या डावात अपयश आल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात ५८ धावांची खेळी केली. वाचा- भारतीय संघासाठी दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी महत्त्वाची आहे. या सामन्यात विजय मिळूव भारताला मालिकेत बरोबरी साधावी लागणार आहे. यासाठी अपयशी ठरलेल्या पृथ्वीच्या ऐवजी शुभमन गिलचा विचार केला जाऊ शकतो. वाचा- ख्राइस्टचर्च येथे गिलने गेल्याच महिन्यात न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतकी (२०४) खेळी केली होती. त्याच सामन्यात त्याने पहिल्या डावात ८३ धावा केल्या होत्या. गिलने सलामीचा फलंदाज म्हणून याआधीच दावा केला होता. पण विराटने शुभमन ऐवजी पृथ्वीला संधी दिली. वनडे पाठोपाठ पृथ्वीला कसोटीत देखील धावा करण्यात अपयश आले. वाचा- वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर पृथ्वी अपयशी ठरला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी या गोलंदाजांनी पृथ्वीला बाद केले. त्यामुळेच दुसऱ्या कसोटी सामन्यात पृथ्वी ऐवजी गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील महत्त्वाच्या या सामन्यात विराट काय निर्णय घेतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2vio3UD
No comments:
Post a Comment