मुंबई: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन ५ वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असला तरी त्याचे प्रेम पदोपदी दिसत असते. काही दिवसांपूर्वी सचिनने ऑस्ट्रेलियातील बुश फायर सामन्याच्या दरम्यान एक ओव्हर बॅटिंग देखील केली होती. वाचा- सचिनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत १० महिन्याचा एक मुलगा क्रिकेटच्या मैदानावर बसला आहे. त्याच्या समोर क्रिकेट किट, बॅट, चेंडू आहे. १० महिन्याच्या या मुलाचे नाव श्रेष्ठ आहे आणि तो बॅटने खेळत आहे. आनंद मेहता नावाच्या एका व्यक्तीने ट्विटवर हा फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना ते म्हणतात, 'सचिन सर तुम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाही. लिटिल मास्टर ब्लास्टरला आमच्या लिटिल मास्टर (श्रेष्ठ मेहता)चे अभिवादन!' वाचा- या फोटोत आनंद मेहता यांनी सचिनला टॅग केले होते. सचिनने देखील हा फोटो रिशेअर केला. 'क्रिकेट खेळण्यासाठी वयाचे बंधन नसते. इतके गोड फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद. १० महिन्याच्या श्रेष्ठला आणि त्याच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा,' असे सचिनने म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ceZMzp
No comments:
Post a Comment