नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा अष्ठपैलू क्रिकेटपटू याने एका भारतीय वंशाच्या मुलीसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅक्सवेलने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. भारतीय वंशाची असे मॅक्सवेलच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. मॅक्सवेलने विनी सोबतच्या साखरपुड्याचा फोटो इस्टाग्रामवर शेअर केला. विनीने देखील दोघांचा फोटो स्वत:च्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेल्या आठवड्यात मॅक्सवेलने लग्नासाठी विचारणा केल्याचे विनीने फोटो शेअर करताना म्हटले आहे. गेल्याच आठवड्यात माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीने लग्नासाठी प्रपोज केले, असे विनीने म्हटले. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दुखापतीमुळे मॅक्सवेल संघाबाहेर आहे. त्याला आठ आठवड्यांची विश्रांती सांगितली आहे. मॅक्सवेलने काही महिन्यांपूर्वी मानसिक आरोग्य ठीक नसल्याने एक वर्ष न खेळण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या मानसिक आरोग्यासंदर्भात विनीने मोठी साथ दिल्याचे मॅक्सवेलने म्हटले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2T6u4Nr
No comments:
Post a Comment