Ads

Wednesday, February 5, 2020

मैदानाबाहेर देखील कोहलीच 'विराट'; सलग तिसऱ्या वर्षी अव्वल!

नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज रन मशीन फक्त मैदानावरच नाही तर मार्केट व्हॅल्यूबाबत सुपरहिट आहे. फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट कोहली भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू मध्ये सर्वांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने सलग तिसऱ्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे. अमेरिकेच्या ग्लोबल अ‍ॅडव्हाझरी फर्म डफ अ‍ॅण्ड फेल्प्सच्या रिपोर्टनुसार () विराटची ब्रँड व्हॅल्यू २३७.५ मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे १ हजार ६९१ कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू २३ मिलियन डॉलर इतकी आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू रोहितपेक्षा तब्बल १० पट अधिक आहे. वाचा- ब्रँड व्हॅल्यूच्या बाबत विराटने बॉलिवूडचे स्टार अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणबीर सिंह, सलमान खान, शाहरुख खान यासारख्या आघाडीच्या कलाकारांना देखील मागे टाकले आहे. क्रिकेटपटूंचा विचार केल्यास माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी, हिटमॅन रोहित शर्मा हे पहिल्या वीसमध्ये आहेत. वाचा- अशी आहे यादी १) विराट कोहली- १ हजार ६९१ कोटी २) अक्षय कुमार- ७४५ कोटी ३) दीपिका पादुकोण- ६६६ कोटी ३) रणबीर सिंग- ६६६ कोटी ५) शाहरुख खान- ४७१ कोटी ६) सलमान खान- ३९७ कोटी ९) महेंद्र सिंह धोनी- २९४ कोटी १५) सचिन तेंडुलकर- १७९ कोटी २०) रोहित शर्मा- १६४ कोटी


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31sDlSe

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...