नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने विकेटकीपर म्हणून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच की काय विकेटकीपर म्हणून कोणत्याही खेळाडूने काही केले तर त्याची तुलना थेट धोनीशी केली जाते. न्यूझीलंडचा माजी विकेटकीपर पीटर मॅक्ग्लाशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विकेटकीपर म्हणून पीटरने धोनीला मागे टाकले आहे, अशी प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स देत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत फलंदाज शॉट मारल्यानंतर पहिली धाव घेतो. दुसरी धाव घेत असताना धावबाद होण्याची शक्यता होती. तेव्हा पीटरने गोलंदाज जेथून गोलंदाजी करतो (नॉन स्ट्रायकर एन्ड) त्या विकेटकडे धाव घेतली आणि फलंदाजाला धाव बाद केले. वाचा- क्रिकेटमध्ये अनेक वेळा असे दिसते की, जेव्हा थ्रो लॉन्ग ऑफ किंवा लॉन्ग ऑनकडून येतो तेव्हा नॉन स्ट्रायकर कडील फलंदाज बाद होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी विकेटकीपरला वेगाने आलेला थ्रो पकडून धावबाद करण्याची संधी असते. पण तो दुसऱ्या बाजूला असल्यामुळे अशा प्रकारे धावबाद करणे शक्य होतेच असे नाही. पीटरने ही संधी बरोबर ओळखली आणि फलंदाजाला बाद केले. इंग्लंडचा माजी विकेटकीपर जॅक रसल याने देखील पिटरच्या या अफलातून धावबाद करण्याच्या कल्पनेचे कौतुक केले आहे. पिटरने मानले आभार... धावबाद केल्यानंतर अनेकांनी माझे अभिनंदन केले त्यामुळे नक्कीच आनंद झाला. अन्य विकेटकीपर असे का करत नाहीत हे माहिती नाही. चेंडू टाकल्या टाकल्या नॉन स्ट्रायकरकडील फलंदाज धाव घेण्यासाठी पळतो. माझ्यासाठी चेंडू पकडणे अधिक सहज होते त्यामुळे मी पटकन नॉन स्ट्रायकर विकेटच्या दिशेने गेलो आणि धावबाद केले. वाचा- पीटरने २००६मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पदार्पण केले होते. न्यूझीलंडकडून पीटरने ११ टी-२० आणि ४ वनडे सामने खेळले आहेत. २०१०मध्ये तो न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला होता. वनडेत त्याने ६३ धावा आणि ७ कॅच पकडले आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Te7mTH
No comments:
Post a Comment