पुणे: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७८ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका २-०ने जिंकली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. पुण्यातील सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली होती. शिखर धवन आणि केएल. राहुल यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ६ बाद २०१ धावा केल्या. उत्तरादाखल लंकेचा डाव १५.५ षटकात १२३ धावांवर संपुष्ठात आला. वाचा- भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२०मधील हा १३वा विजय ठरला. या विजयासह भारताने पाकिस्तानसह जगभरातील सर्व संघांना मागे टाकत नवा विक्रम केला. भारताने श्रीलंकेविरुद्ध १९ सामन्यात १३ विजय मिळवले आहेत. टी-२०मध्ये एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या यादीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. पण ते १३ विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला २१ सामने खेळावे लागले होते. भारताने १९ सामन्यात १३ विजय मिळवत पाकिस्तानला मागे टाकले. वाचा- आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर असेलल्या पाकिस्तानने श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या विरुद्ध प्रत्येकी २१ सामन्यात १३ विजय मिळवले आहेत. वाचा- भारताशिवाय इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध १३ विजय मिळवले आहेत. पण त्यासाठी त्यांनी २१ सामने खेळावे लागले. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धच्या १५ पैकी १२ सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तानने २३ टी-२० सामन्यापैकी १२ वेळा ऑस्ट्रेलियाला हरवले आहे. टी-२०मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ १) भारत- श्रीलंका विरुद्ध १९ सामन्यात १३ विजय २) पाकिस्तान- न्यूझीलंड आणि श्रीलंकाविरुद्ध २१ सामन्यात प्रत्येकी १३ विजय ३) इंग्लंड- न्यूझीलंडविरुद्ध २१ सामन्यात १३ विजय ४) अफगाणिस्तान- आयर्लंडविरुद्ध १५ सामन्यात १२ विजय ५) पाकिस्तान- ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ सामन्यात १२ विजय हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2R5b8MF
No comments:
Post a Comment