बेंगळुरू: यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात अनेक विक्रम होण्याची शक्यता आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात १० विकेटनी पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने राजकोट येथील सामन्यात शानदार कामगिरी केली होती. तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय भूमीवर सलग दुसरा मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर भारतीय संघ त्यांना रोखण्यासाठी मैदानात उतरेल. बेंगळुरूच्या मैदानावर काही विक्रम होण्याची शक्यता आहे. >> वनडे क्रिकेटमध्ये ५ हजार धावा करण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली १७ धावांची गरज आहे. या सामन्यात विराटने १७ धावा केल्यास कर्णधार म्हणून ५ हजार धावा करणारा तो आठवा कर्णधार ठरले. तर कर्णधार म्हणून वेगवान ५ हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर नोंदवला जाईल. वाचा - >> ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला वनडेमध्ये १०० विकेटचा टप्पा गाठण्यासाठी आणखी दोन विकेटची गरज आहे. जर त्याने या सामन्यात दोन विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाकडून सर्वात वेगाने १०० विकेट घेणारा गोलंदाज ठरले. वाचा- >> बेंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताच्या रोहित शर्माने गेल्या तीन वनडेत ३१८ धावा केल्या आहेत. यात एका द्विशतकाचा देखील समावेश आहे. त्यामुळे भारतासाठी रोहितची फलंदाजी या सामन्यात महत्त्वाची ठरणार आहे. >> भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १३९ सामने झाले आहेत. त्यापैकी ७८ सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर ५१ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. १० सामने ड्रॉ झाले आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TFclgy
No comments:
Post a Comment