नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षात भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले आहे. भारतीय संघाच्या वर्चस्वाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टीम इंडियाची टॉप ऑर्डर होय. भारतीय संघातील आघाडीच्या तिघा फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळेच भारत वनडेमध्ये चांगली कामगिरी करू शकला. , आणि विराट कोहली या दोघांनी गेल्या दोन वर्षात सातत्याने धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३पासून या तिघांनी संघाने केलेल्या एकूण धावांच्या ५८ टक्के धावा केल्या आहेत. भारतीय संघाची सलामीची जोडी रोहित शर्मा () आणि शिखर धवन () आता एका विक्रमाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही जोडीला अशी कामगिरी करता आलेली नाही. भारतीय संघ १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत जर रोहित आणि शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली तर त्यांच्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला जाईल. मालिकेतील पहिला सामना मुंबईत १४ जानेवारी रोजी होणार आहे. दुसरा सामना राजकोट येथे १७ तारखेला तर तिसरी आणि अखेरची वनडे १९ जानेवारी रोजी बेंगळुरूत होईल. वाचा- वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या संघविरुद्ध सर्वाधिक शतकी भागिदारी करण्याचा विक्रम रोहित-शिखरच्या नावावर जमा होऊ शकतो. या दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २२ डावात ६ वेळा शतकी भागिदारी केली आहे. सध्या या क्रमवारीत रोहित-शिखर संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांनी भारताविरुद्ध २२ डावात ६ शतकी भागिदारी केल्या आहेत. तर महेंद्र सिंह धोनी आणि युवराज सिंग यांनी पाकिस्तानविरुद्ध १४ डावात ५ शतकी भागिदारी केल्या आहेत. वाचा- श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान यांनी न्यूझीलंडविरुद्ध १७ डावात पाच तर भारताच्या सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१ डावात पाच शतकी भागिदारी केली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36OlVBx
No comments:
Post a Comment