Ads

Friday, January 10, 2020

जेव्हा देव अपयशी ठरायचा तेव्हा 'द वॉल' असायची!

नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनचे विक्रम आणि एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता यामुळे सचिनला 'गॉड ऑफ ' म्हटले जाते. पण जेव्हा देव अपयशी ठरायचा तेव्हा मदतीला येत होती 'द वॉल'! भारतीय संघात द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रवीडचा () आज ४७वा वाढदिवस आहे. वनडे आणि कसोटीमधील भारतीय संघातील क्रमांक तीनचा सर्वोत्तम फलंदाज राहुल द्रवीडवर आज सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताकडून १९९६मध्ये पदार्पण करणाऱ्या द्रवीडने १६ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये १६४ कसोटी, ३३४ वनडे आणि एका टी-२० सामन्यात देशाचे प्रतिनिधीत्व केले. सचिन तेंडुलकर वगळता राहुल हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने वनडे आणि कसोटीमध्ये १० हजारहून अधिक धावा केल्या. वाचा- सर्वोत्तम कसोटी फलंदाज अशी द्रवीडची ओळख असली तरी वनडेमधील त्याची कामगिरी शानदार अशीच आहे. वनडेमध्ये द्रवीडने ३३४ सामन्यात ३९.१६च्या सरासरीने १० हजार ८८९ धावा केल्या आहेत. तर कसोटीमध्ये ५२.३१च्या सरासरीने १३ हजार २८८ धावा केल्या. कसोटी त्याच्या नावावर ३६ शतकांचा समावेश आहे. भारतीय फलंदाजांमध्ये कसोटीमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिननंतर द्रवीडचा क्रमांक लागतो. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने राहुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा () देताना न्यूझीलंडविरुद्धची त्याची १५३ धावांच्या खेळीचा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. द्रवीडने १९९९मध्ये हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात नाबाद १५३ धावा केल्या होत्या. यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या सामन्यात द्रवीडने सचिन तेंडुलकरसोबत ३३१ धावांची भागिदारी केली होती. भारताने या सामन्यात दोन बाद ३७६ धावा केल्या होत्या आणि १७४ धावांनी विजय मिळवला होता. अशा एकमेव खेळाडू आहे ज्याने वनडेमध्ये दोन वेळा ३००हून अधिक धावांची भागिदारी केली आहे. २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर २०१४पर्यंत द्रवीड राजस्थानकडून आयपीएल खेळत होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कोच म्हणून त्याने काम पाहिले. भारतीय अ संघाचा आणि १९ वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक म्हणून देखील द्रवीडने काम केले. द्रवीडच्या मार्गदर्शनाखालीच पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, ऋषभ पंत, मनीष पांडे, शुभमन गिल हे खेळडू तयार झाले आहेत आणि सध्या भारताच्या मुख्य संघाकडून खेळत आहेत. वाचा- द्रवीड प्रशिक्षक असतानाच २०१८मध्ये भारताच्या १९ वर्षाखालील संघाने वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. सध्या द्रवीड बेंगळूरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37SXQcQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...