Ads

Friday, January 10, 2020

टीम इंडियाने केली पाकच्या विक्रमाची बरोबरी

पुणे: भारतीय संघाने शुक्रवारी पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७८ धावांनी पराभव करत मालिका विजय मिळवला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता. अखेरच्या सामन्यात देखील भारतीय संघाने शानदार खेळ करत नव वर्षातील पहिल्याच मालिकेत विजय नोंद केली. पुण्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आणि खेळाडूंनी काही रेकॉर्ड केलेत. त्यावर एक नजर.... >> भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध सलग १२व्यांदा द्विपक्षीय मालिका जिंकली आहे. टी-२० क्रिकेटमधील भारताची लंकेविरुद्धचा हा १३वा विजय आहे. एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या पाकिस्तान संघाच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली. >> पुण्यात झालेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने लंकेच्या दनुष्का गुणाथिलाकाची विकेट घेतली. या विकेटसह तो टी-२०मध्ये भारताकडून सर्वांधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ५३ विकेट घेतल्या आहेत. ५२ विकेटसह युजवेंद्र चहल आणि आर.अश्विन दुसऱ्या स्थानावर आहेत. वाचा- >> भारताचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आणि सहावा क्रिकेटपूट ठरला आहे. याआधी महेंद्र सिंह धोनीने अशी कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून सर्वात कमी डावात ११ हजार धावा विराटने पूर्ण केल्या. विराटने १९६ डावात ही कामगिरी केली. त्या पाठोपाठ रिकी पॉन्टिंग (२५२), ग्रॅम स्मिथ (२६४), अॅलन बॉर्डर (३१६) आणि धोनी (३२४) यांचा क्रमांक लागतो. >> भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये १६व्यांदा २००च्या पुढे धावा केल्या. जगातील अन्य कोणत्याही संघाने अशी कामगिरी केली नाही. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी १२ वेळा २०० हून अधिक धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेने ११ वेळा २००हून धावा केल्या आहेत. वाचा- >> पुण्यातील सामन्यात भारताने ऋषभ पंतच्या ऐवजी संजू सॅमसन याला संधी दिली. संजूने याआधी १९ जुलै २०१५मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे एकच टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघात संधी मिळाली नाही. २०१५नंतर भारताने ७३ टी-२० सामने खेळले आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39Y5Mv7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...