नवी दिल्ली: भारतीय संघाला २००७चा टी-२० वर्ल्ड कप, २०११चा आयसीसी वर्ल्ड कप जिंकून देणारा मोठ्या कालावधीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. धोनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्या सामन्यात धोनीने अर्धशतक केले होते पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला होता. त्यानंतर धोनी मैदानात उतरलेला नाही आणि त्यामुळेच त्याच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. धोनी मैदानावर कधी दिसणार याबद्दल त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. धोनीच्या चाहत्यांना लवकरच तो मैदानावर दिसणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या आगीत हजारो प्राण्यांना जीव गमवावा लागला. हजारो प्राणी जखमी झालेत. तर, अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आग पीडितांच्या मदतीसाठी एका सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सामन्यात आणि महेंद्र सिंह धोनी देखील खेळण्याची शक्यता आहे. वाचा- मदतनिधीसाठीचा सामना ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संघाचे नेतृत्व रिकी पॉन्टिंग करणार असून दुसऱ्या संघाचे नेतृत्व शेन वॉर्न करणार आहे. ब्रेट ली, जस्टिन लॅगर, मायकल क्लार्क, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉटसन आणि अॅलेक्स ब्लॅकवेल हे खेळाडू देखील या सामन्यात खेळणार आहेत. मदतनिधी सामन्यातून जमा होणारी रक्कम ऑस्ट्रेलिया रेड क्रॉस संघटनेला दिली जाणार आहे. वाचा- मदतनिधीसाठी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशिवाय अन्य देशातील खेळाडू देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधी देखील मदतनिधीसाठी झालेल्या सामन्यात स्टार क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. २००५मध्ये त्सुनामी पीडित लोकांसाठी वर्ल्ड इलेव्हन आणि आशिया इलेव्हन यांच्यातील सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर झाला होता. ऑस्ट्रेलियातील आग पीडितांच्या मदतीसाठी महान गोलंदाज शेन वॉर्न याने त्याच्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव केला होता. या लिलावात वॉर्नच्या कॅपला १० लाख ७ हजार ५०० ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी बोली मिळाली होती. भारतीय चलनात ही किमत ४ कोटी ९२ लाख ८ हजार रुपये इतकी होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ti0s5h
No comments:
Post a Comment