नवी दिल्ली: गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात धाव बाद झाला आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन दुखावले गेले. अवघ्या काही इंचाने धोनीची बॅट रेषेच्या बाहेर होती. भारताचा डाव कोसळला असताना धोनीने संयमी फलंदाजीकरत शेवटपर्यंत विजयाची आशा जिवंत ठेवली होती. धोनी बाद झाला आणि भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. सेमी फायनल सामन्यात धोनीच्या रन आऊटबद्दल आणि त्याला इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याबद्दल अनेकांनी टीका केली. पण या सर्व घटनेवर धोनीने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मी धावाबाद झाल्याचे दु:ख अजून माझ्या मनात आहे. तेव्हा मी का उडी मारली नाही. वाचा- वर्ल्ड कपमधील भारतीय संघाच्या पराभवाला मोठा कालावधी झाला आहे. तरी देखील धोनीच्या मनात त्याबद्दलचे दु:ख आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना धोनी म्हणाला, 'मी स्वत:ला आजही प्रश्न विचारतो. तेव्हा मी डाईव्ह (उडी) का मारली नाही. ते दोन इंच मला नेहमी सांगत असतात की, एम.एस.धोनी तू उडी मारू शकला असतास.' न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यानंतर धोनी क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही. या काळात धोनीच्या निवृत्तीबद्दल देखील चर्चा सुरु झाली होती. काही दिवसांपूर्वी धोनी वनडेमधून निवृत्ती घेत फक्त टी-२० सामने खेळणार असल्याचे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार असून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात असेल, अशी चर्चा आहे. वाचा- काय झालं होतं त्या ओव्हरमध्ये वर्ल्ड कपमधील साखळी स्पर्धेत भारताची कामगिरी शानदार होती. त्यानंतर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला २४० धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची खराब सुरुवात झाली. त्यानंतर धोनीने रविंद्र जडेजासोबत भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले. अखेरच्या दोन ओव्हर शिल्लक असताना धोनीने ४९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दुहेरी धावा घेताना मार्टिन गुप्टिलच्या थ्रोवर धोनी बाद झाला. गुप्टिलच्या त्या थ्रोने भारतीय संघाचे आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंगले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QMVSVy
No comments:
Post a Comment