राजकोट: भारतीय कसोटी संघात माजी क्रिकेटपटू राहुल द्रवीडनंतर द वॉल अशी ओळख निर्माण करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने () प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक झळकावले आहे. राजकोट येथे माधवराव सिंधीया मैदानावर सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सामन्यात पुजाराने विक्रमी द्विशतकी खेळी केली. रणजी ट्रॉफीत सौराष्ट्र विरुद्धच्या एलिट ग्रुप ए आणि ग्रुप बीमधील सामन्यात कर्नाटककडून खेळताना पुजाराने ३१४ चेंडूत १३वे द्विशतक पूर्ण केले. भारताकडून प्रथम श्रेणी सामन्यात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजांना इतकी द्विशतके केली नाहीत. त्याआधी शनिवारी पुजाराने शतकी खेळी केली होती. ते पुजाराची ५०वी शतकी खेळी होती. त्याच शतकाचे त्याने द्विशतक केले. वाचा- भारताकडून प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम पुजाराच्या नावावर आहे. पुजाराने रविवारी आणखी एक द्विशतक करत स्वत:चे स्थान मजबूत केले. सर्वाधिक द्विशतकाच्या यादीत पुजारानंतर विजय मर्चेंट यांचा क्रमांक लागतो. विजय मर्चेंट यांनी ११ द्विशतके केली आहेत. त्यानंतर प्रत्येकी १० द्विशतकासह विजय हजारे आणि सुनील गावस्कर हे तिसऱ्या स्थानावर आहेत. पण या तिन्ही क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. वाचा- प्रथम श्रेणी सामन्यात १५ हजारहून अधिक धावा करणाऱ्या पुजाराने भारतीय संघाकडून ७५ कसोटी सामन्यात ५ हजार ७४० धावा केल्या आहेत. यात ३ द्विशतके, १८ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. पुजाराची कसोटीमधील सरासरी ५०च्या जवळ आहे. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2R6y8La
No comments:
Post a Comment