नवी दिल्ली: 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतीय संघातील गोलंदाज बंदीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर हार्दिक आयपीएल आणि वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला. पण कंबर दुखीमुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. हार्दिक तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ क्रिकेटपासून दूर होता. आता तो पुनरागमन करण्यास तयार आहे. दरम्यान त्याने साखरपुडा देखील करून घेतला. काही दिवसांपूर्वी 'कॉफी विथ करण' शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर हार्दिकने मैन सोडले होते. आता स्वत:च्या इमेजबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला, लोक मला गर्विष्ठ समजतात. मला अजून ही आठवते की, मी एक आठवडा ते १० दिवस घरातून बाहेर पडलो नव्हतो. लोक माझ्याबद्दल गैरसमज करून घेतात. त्यांना वाटते की मी गर्विष्ठ आहे आणि माझ्यासोबत सहजपणे बोलता येत नाही. पण नंतर अनेक लोकांनी मला येवून सांगितले की, आम्हाला तु गर्विष्ठ वाटला होता. पण प्रत्यक्षात तु तसा नाहीस. वाचा- फिटनेस टेस्टमध्ये अपयशी शनिवारी मुंबईत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये हार्दिक अपयशी ठरला. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघातून त्याला बाहेर करण्यात आले. हार्दिकच्या जागी आता तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकर याला संधी देण्यात आली आहे. भारताचा अ संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन लिस्ट मॅच, दोन वनडे आणि दोन सराव सामने खेळणार आहे. वाचा- आज होणार भारतीय संघाची निवड न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची आज निवड होणार आहे. भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ५ टी-२०, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर काही महिन्यातच ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळेच निवड समितीचे लक्ष वर्ल्ड कपच्या दृष्टीने खेळाडूंची निवड करण्याकडे असेल. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतील संघच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी असण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समिती १५ ऐवजी १६ किंवा १७ जणांची निवड करते का याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताच्या मुख्य संघासोबतच भारताचा अ संघ देखील न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे गरज पडली तर निवड समितीकडे खेळाडूंचा पर्याय असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/36JnVLq
No comments:
Post a Comment