उदयपूर: भारतीय क्रिकेटपटू प्रियसी शनाया टंकरीवाला सोबत विवाहबद्ध झाला. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या विवाह सोहळ्यात दोघांनी सात फेरे घेतले. भारताचा जलद गोलंदाज वरून आरोन याने इंस्टाग्रामवर शुक्रवारी करुण आणि शनायाचे फोटो शेअर केले. भारतीय संघाकडून ६ कसोटी सामने खेळले आहेत. शनाया प्रसार माध्यमात काम करते. गेल्या वर्षी जुनमध्ये करुण आणि शनाया यांनी साखरपूडा केला होता. गुरुवारी करुण आणि शनाया यांनी काही जवळच्या नातेवाईकांसह विवाह केला. करुण सध्या कर्नाटककडून प्रथम श्रेणी सामने खेळत आहे. करुण आणि शनाया गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्यावर्षी करुणने शनायाला विवाहासाठी विचारणा केली होती. करुणने प्रथम श्रेणी सामन्यातून ५ हजार ४४६ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून ६ कसोटी सामने खेळले आहेत. करुणच्या नावावर एका त्रिशतकाचा समावेश आहे. टीम इंडियाकडून दोन वनडे सामने खेळला आहे. करुणने इंग्लंडविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात नाबाद ३०३ धावा केल्या होत्या. कसोटीत ते त्याचे पहिले शतक होते जे त्याने त्रिशतक केले. भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा तो दुसरा फलंदाज आहे. मार्च २०१७मध्ये त्याने धर्मशाळा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30wVOga
No comments:
Post a Comment