बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरचा वनडे सामना एम.चिन्नास्वाामी स्टेडियमवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजीसाठी मैदानात उरलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली आहे. कर्णधार विराट कोहलीसह सर्व भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली असून ही पट्टी भारतीय क्रिकेटमधील माजी दिग्गज खेळाडूच्या सम्मानासाठी बांधण्यात आली आहे. शुक्रवारी म्हणजेच १७ जानेवारी रोजी भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रमेशचंद्र ऊर्फ यांचे निधन झाले. बापूंनी १३ वर्ष भारतीय संघाकडून कसोटी सामने खेळले. वयाच्या ८६ वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. बापूंच्या सन्मानासाठी भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी काळी पट्टी बांधली आहे. सामन्यांच्या आधी बीसीसीआयने यासंदर्भातील घोषणा केली होती. वाचा- असे होते बापूंचे करिअर बापू नाडकर्णी यांच्या नावावर सलग २१ ओव्हर निर्धाव टाकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. बापूंनी १९५५मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर १९६८ पर्यंत त्यांनी भारताकडून ४१ कसोटी सामने खेळले. ६५ डावात त्यांनी ८८ विकेट घेतल्याय. बापूंच्या करिअरची सरासरी ही १.७ रन प्रति ओव्हर आहे. फलंदाज म्हणून बापूंनी १ हजार ४१४ धावा केल्या. त्यात एक शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश होता. बापूंच्या निधनानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. बापूंच्या निधनामुळे माझ्या कुटुंबातील व्यक्तीला गमवल्यासारखे वाटते. त्यांच्यासारखा हिरा पुन्हा कधीच सापडणार नाही, असे सुनील गावस्कर म्हणाले होते. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2R8o2e7
No comments:
Post a Comment