वेलिंग्टन: इंग्लंडचा जलद गोलंदाज याच्यावर गेल्या वर्षी वर्णभेदी टीका करणाऱ्या एका प्रेक्षकावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधीत घटनेची न्यूझीलंड बोर्डाने गंभीर दखल घेतली आहे. आर्चरवर वर्णभेदी टीका करणाऱ्या चाहत्यावर दोन वर्ष आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामने मैदानावर येवून पाहण्यास बंदी घातली. नोव्हेंबर महिन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना झाला होता. या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी जोफ्रा आर्चर ड्रेसिंग रूममध्ये जात असताना एका प्रेक्षकाने त्याच्यावर वर्णभेदी टीका केली. संबंधित व्यक्तीने जोफ्राच्या रंगावरून अपशब्द देखील वापरले होते. वाचा- या घटनेची माहिती जोफ्राने ट्विटवरून दिली होती. या घटेनंतर ऑकलंड येथे राहणाऱ्या संबंधीत २८ वर्षीय प्रेक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी न्यूझीलंड क्रिकेटचे प्रवक्ते अँथोनी क्रमी यांनी जोफ्रा आणि इंग्लंड संघाची माफी मागितली. जे काही झाले तो चुकीचे होते. अशा प्रकारचे वर्तन आम्ही कधीच मान्य करणार नाही. ज्या व्यक्तीने वर्णभेदी टीका केली होती त्याला २०२२पर्यंत क्रिकेट सामने पाहता येणार नाही. या बंदीचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई केली. असे क्रमी म्हणाले. वाचा- वर्णभेदी टीका झाल्यानंतर जोफ्राने त्यासंदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने अशा प्रकारच्या टीकेमुळे दु:ख झाल्याचे म्हटले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Nr4jE5
No comments:
Post a Comment