Ads

Tuesday, November 5, 2019

आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव डिसेंबर अखेरीस

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेसाठी येत्या १९ डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. कोलकाता येथे हा लिलाव होणार असल्याचं आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने स्पष्ट केलं. दरवर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी पहिल्यांदाच कोलकात्यात लिलाव होणार आहे. आज आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पार पडली. त्यात १९ डिसेंबरपासून आयपीएल खेळाडूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आधी आयपीएल खेळाडूंचा लिलाव बेंगळुरूमध्ये केला जायचा. २०१९मध्ये प्रत्येक फ्रँचाइजला ८२ कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं. २०२०मध्ये ही रक्कम वाढून ८५ कोटी एवढी झाली आहे. या शिवाय अतिरिक्त तीन कोटी आयपीएलच्या प्रत्येक संघाजवळ असणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे ७.७ कोटी, राजस्थान रॉयल्सकडे ७.१५ कोटी आणि केकेआरकडे ६.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या आयपीएल स्पर्धेपूर्वी लसित मलिंगा, ब्रॅडन मॅक्लम, सॅम क्युरेन, कॉरेन अॅण्डरसन, कॉलिन इनग्राम, शॉन मार्श, अँजेलो मॅथ्यू, डार्सी शॉर्ट आणि ख्रिस वोक्स या खेळाडूंना सर्वाधिक मागणी होती. यंदा आयपीएलच्या मोसमात कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक >> चेन्नई सुपर किंग्स- ३.२ कोटी >> दिल्ली कॅपिटल्स- ७.७ कोटी >> किंग्ज इलेव्हन पंजाब- ३.७ कोटी >> कोलकाता नाइट रायडर्स- ६.०५ कोटी >> मुंबई इंडियन्स- ३.५५ कोटी >> राजस्थान रॉयल्स- ७.१५ कोटी >> रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- १.८० कोटी >> सनराईज हैदराबाद- ५.३० कोटी


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JN01oP

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...