अॅडिलेड: शनिवारी पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. ३० वर्षीय स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. स्मिथने त्याच्या ७० व्या कसोटी सामन्यातील १२६ व्या डावात वेगवान वेगवान गोलंदाज मोहम्मद मूसाच्या चेंडूवर धाव घेत वॉल्टर हॅमंडचा ७३ वर्षे जुना विक्रम मोडला. इंग्लंडच्या या माजी फलंदाजाने १९४६ साली भारताविरुद्ध ओव्हलवर हा विक्रम केला होता. हॅमंडने १३१ कसोटी सामन्यात ७००० धावा पूर्ण केल्या होत्या. तिसर्या क्रमांकावर सेहवाग भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. सेहवागने ७९ सामने आणि १३४ डावांमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. गॅरी सोबर्स, कुमार संगकारा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील १३८ डावांत ७००० धावांचा टप्पा गाठलेला आहे. विराट अजूनही आहे खूप मागे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मागील महिन्यातच हे स्थान मिळवले होते. परंतु, त्याला त्यासाठी १३८ डाव खेळावे लागले होते. पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात विराटने हा पराक्रम केला. २०११ मध्ये पहिला कसोटी सामना खेळणार्या विराटचा हा ८१ वा सामना होता. दिग्गज ब्रॅडमनना टाकले मागे स्मिथने हा विक्रम नोंदवत दिग्गज क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. आपल्या कसोटी कारकीर्दीत ब्रॅडमन यांनी ६९९६ इतक्या धावा केल्या आहेत. तर, स्मिथने ७००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तथापि, ब्रॅडमन यांनी केवळ ५२ कसोटी सामन्यांमध्ये ९९.९४ च्या सरासरीने ६९९६ धावा केल्या आहेत. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात डाव आणि पाच धावांनी विजयी झालेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या सामन्यातही आपली पकड आणखी मजबूत केली आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही दुसर्या दिवशी द्विशतक झळकावले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Oy3NoB
No comments:
Post a Comment