नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरुद्ध येत्या ६ डिसेंबरपासून होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. भारताचा सलामीवीर याला मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज ला संधी देण्यात आली आहे. शिखर धवन हा सध्या गुडघ्याच्या दुखापतीनं हैराण आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात झेल पकडताना त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला तब्बल २० टाके घालावे लागले आहेत. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं मंगळवारी त्याची फिटनेस टेस्ट केली. धवन पूर्ण बरा होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असं तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांच्या अहवालानंतर त्याला टी-२० मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. संजू सॅमसनला बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेतही संधी देण्यात आली होती. मात्र, अंतिम संघात त्याला स्थान मिळू शकलं नव्हतं. तीन सामन्यांची ही मालिका भारतानं २-१ नं जिंकली होती. पुढील महिन्यात भारत व वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची होणार आहे. यातील पहिला सामना ६ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुवअनंतपुरममध्ये तर, अखेरचा सामना ११ डिसेंबरला मुंबईत खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, संजू सॅमसन
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33qrO5e
No comments:
Post a Comment