लखनऊ: टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय अकादमीचा संचालक यानं आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना पुरेशी संधी मिळत नाही असं सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय प्रशिक्षकांना 'सपोर्ट स्टाफ'मध्ये न घेऊन संघ चूक करत आहेत, असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं. भारतीय प्रशिक्षक काही कमी नाहीत, असंही तो म्हणाला. राहुल द्रविड हा लखनऊमध्ये १९ वर्षांखालील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका पाहण्यासाठी आला आहे. त्यावेळी त्यानं आयपीएलविषयी मत व्यक्त केलं. आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना फारशी संधी दिली जात नसल्याबद्दल माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक असलेल्या द्रविडनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याकडेही काही उत्तम प्रशिक्षक आहेत असं मला वाटतं. त्यांच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपलं क्रिकेट आणि प्रशिक्षक प्रतिभासंपन्न आहेत, असं द्रविड म्हणाला. आपल्या प्रशिक्षकांचा आत्मविश्वास वाढवण्याची नितांत गरज आहे. आपल्या प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये सहायक प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली जात नाही याचं मला वाईट वाटतं, असंही तो म्हणाला. ' स्पर्धेत भारतीय खेळाडू मोठ्या संख्येनं खेळतात. स्थानिक प्रशिक्षक असल्याचा फायदा त्यांना होतो. त्यांना भारतीय खेळाडूंमधील क्षमता माहीत आहे,' असंही त्यानं सांगितलं. राहुल द्रविड यानं वयचोरी, मैदानातील माळ्यांची मेहनत, कार्यालयीन क्रिकेट, रणजी स्पर्धा, कसोटींचे महत्त्व अशा अनेक मुद्यांवर कायम स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकत्याच झालेल्या डे-नाइट कसोटी सामन्याविषयीही त्यानं भाष्य केलं होतं. ‘डे-नाइट कसोटीचे आयोजन प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये खेचून आणेलच; पण कसोटी क्रिकेटला संजीवनी देण्यासाठी, कसोटीचा प्रेक्षक वाढवण्यासाठी इतर मुद्यांवरही सुधारणा अपेक्षित आहे’, असं सूचक विधान त्यानं केलं होतं. ‘कसोटी क्रिकेटच्या संजीवनीसाठी डे नाइट कसोटींचे आयोजन हा एकमेव तोडगा नाही. तसेही आपण दवाच्या परिणामांवर नियंत्रण मिळवू शकलो तर डे नाइट कसोटी वर्षांत एकदा, दोनदा नक्की आयोजित करता येईल. दवामुळे चेंडू ओलसर होतो, ज्यामुळे गोलंदाजांची कसोटी लागते. अशा परिस्थितीत चेंडू स्विंगही करता येत नाही. ही डे नाइट कसोटीतील आव्हाने आहेत’, याकडेही त्यानं लक्ष वेधलं होतं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2L3DxR6
No comments:
Post a Comment