कोलकाता: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी मालिकेत बांगलादेशला २-० ने मात दिली. या मालिकेचा अखेरचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर डे-नाइट खेळवण्यात आला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक यांनी टीम इंडियाच्या कामगिरीवर चर्चा केली. तसेच महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्यावरही भाष्य केलं. आता काही खेळाडूंचं भवितव्य आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून आहे, असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर क्रिकेटपासून दूर आहे. तेव्हापासून धोनीच्या निवृत्तीवर चर्चा सुरूच आहे. धोनी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल अशी चर्चाही मध्यंतरी झाली. मात्र 'तो सध्या काय करतो?' असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यात धोनीचा एक फोटो समोर आला होता. तो केदार जाधव, माजी गोलंदाज आरपी सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला होता. धोनीच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याबद्दल भाष्य केलं आहे. काही खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीवर पुढचं सगळं ठरेल, असे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं. आयपीएल महत्वाची! लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार अशी चर्चा जगतात सुरू आहे. मात्र, त्यासाठी आयपीएलची वाट पाहावी लागणार आहे, असं शास्त्री म्हणाले. 'तो कधी खेळण्यास सुरुवात करणार आहे आणि आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो यावर सगळं अवलंबून आहे. तर इतर यष्टीरक्षक कशी कामगिरी करतात, धोनीच्या तुलनेत त्यांची कामगिरी कशी आहे, यावरही बरंच काही अवलंबून आहे. आयपीएल ही मोठी स्पर्धा आहे. कारण साधारण १५ खेळाडूंचं स्थान निश्चित झालेले असेल,' असं रवी शास्त्री म्हणाले. धोनी चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर वर्ल्डकप स्पर्धेत सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर धोनीनं क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि लष्करात प्रशिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांसाठी त्याची नियुक्ती श्रीनगरमध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35CedJS
No comments:
Post a Comment