नवी दिल्ली: ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात एका डावानं पराभूत केलं. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथनं स्वतःलाच शिक्षा दिली. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजानं या सामन्यात केवळ चारच धावा केल्या. या खराब कामगिरीमुळं त्यानं स्वतःलाच शिक्षा दिली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ब्रिस्बेनमध्ये पहिला कसोटी सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला एक डाव आणि पाच धावांनी पराभूत केलं. या विजयासह यजमान ऑस्ट्रेलियानं २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज यानं या कसोटी सामन्यात केवळ चार धावा केल्या. या खराब कामगिरीमुळं तो स्वतःवरच नाराज आहे. फलंदाजीत समाधानकारक कामगिरी करता आली नसल्यानं त्यानं स्वतःलाच शिक्षा करून घेतली आहे. तो ब्रिस्बेन मैदानापासून ते संघाचं वास्तव्य असलेल्या हॉटेलपर्यंत चालत गेला. हे अंतर जवळपास तीन किलोमीटर आहे. स्मिथला पाकिस्तानचा फिरकीपटू यासीर शाह यानं त्रिफळाचित केलं आणि या गोलंदाजानं त्याला सातव्यांदा बाद केलं आहे. मैदानापासून हॉटेलपर्यंत पायी प्रवास केल्याबद्दल स्मिथला माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. त्यावर 'मी सामन्यात धावा करू शकलो नाही तर नेहमीच स्वतःला शिक्षा करून घेतो. जेव्हा एखाद्या सामन्यात चांगली फलंदाजी करतो, किंवा शतक झळकावल्यास मी स्वतःलाच चॉकलेट भेट देतो,' असं त्यानं सांगितलं. जगातील अव्वल फलंदाज स्मिथ यानं स्वतःविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. जेव्हा मी शतक झळकावतो त्यावेळी स्वतःला पूर्ण गुण देतो, असं तो म्हणाला. स्मिथ आतापर्यंत ६९ कसोटी, ११८ एकदिवसीय आणि ३६ टी-२० सामने खेळला आहे. चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर १२ महिन्यांची क्रिकेटबंदी घातली होती. बंदी उठल्यानंतर त्यानं बर्मिंघममध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये पुनरागमन केलं. अॅशेस मालिकेच्या तुलनेत या सामन्यात त्यानं एकूण २८६ धावा (१४४ धावा, १४२ धावा) केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2spp1N2
No comments:
Post a Comment