कोलकाता: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि हे दोघे क्रिकेट सल्लागार समितीत (सीएसी) पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. आज (शनिवार) ही समिती स्थापन केली जाणार आहे. लाभाचे पद भूषवल्याच्या आरोपानंतर दोघांनीही आपली पदे सोडली होती. सचिन आणि लक्ष्मण समितीत परत येणार असल्याची ही माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सचिन आणि लक्ष्मण जुलै महिन्यात समितीपासून दूर झाले होते. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली त्यावेळी सीएसीचे तिसरे सदस्य होते. त्यानंतर गांगुली यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना पुढील प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सचिन आणि लक्ष्मण समितीत नक्कीच परत येतील अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गांगुली यांच्या नेतृत्वात रविवारी मुंबईत मंडळाची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) होणार आहे. तर शिखर परिषदेची बैठकही शनिवारी होत असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सूत्रांनी याबबात दिलेल्या अधिक माहितीनुसार, समितीची स्थापना शिखर परिषदेच्या बैठकीत होणार आहे. सीएसी निवड समितीशीही चर्चा करेल. बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी लाभाचे पद भूषविल्याची तक्रार नोंदवल्यानंतर सचिन, लक्ष्मण आणि गांगुली यांची समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34zEpVj
No comments:
Post a Comment