नवी दिल्ली: संधी मिळूनही फलंदाजीत अपयशी ठरत असलेला युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंतवर चहुबाजूने टीका होत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी पंतला पाठिंबा दिला असला तरी, काहींनी त्यानं खेळात सुधारणा करावी, असं मत व्यक्त केलं आहे. माजी क्रिकेटपटू यानंही त्याला सल्ला दिला आहे. जर पंतनं खेळात सुधारणा केली नाही तर त्याला संघाबाहेर जावं लागेल, असं लक्ष्मण म्हणाला. संघ व्यवस्थापनानं विकेटकीपर रिषभ पंतला जितका वेळ दिला आहे, जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवावा लागेल. जर त्यानं फलंदाजीत सुधारणा केली नाही तर त्याची जागा घेऊ शकतो, असं लक्ष्मण म्हणाला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत संजू सॅमसनची झालेली निवड हा पंतसाठी एक प्रकारे इशारा आहे. त्यामुळं खेळात सुधारणा करावी, अन्यथा संघाबाहेर जाण्याची तयारी ठेवावी, असंही तो म्हणाला. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीनं सॅमसनची संघात निवड करून आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे, असा इशारा दिला आहे. रिषभ पंतला भरपूर संधी मिळाली आहे आणि संघ व्यवस्थापनानं त्याच्याशी चर्चा केली असावी असा मला विश्वास आहे, असंही लक्ष्मण म्हणाला. खेळाडूला संघ व्यवस्थापन आणि निवड समितीनं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवावा लागतो. दुर्दैवानं पंत विश्वास सार्थ ठरवण्यात अपयशी ठरत आहे. मात्र, त्याच्याकडे 'एक्स' फॅक्टर आहे. तो एक जबरदस्त फलंदाज आहे हे मी अजूनही मानतो. मैदानात उतरल्यानंतर तो मोठे फटके मारून सामन्याचं चित्र बदलू शकतो, असा विश्वासही लक्ष्मणनं व्यक्त केला. एक फलंदाज म्हणून त्याचा गोंधळ उडालेला दिसतो. तो दबावात आहे यात शंकाच नाही. पण तो लयीत आल्यावर त्याची मानसिकता वेगळी असते. त्याच्या फलंदाजीच्या शैलीत बदल झालेला दिसतो. संघातील अंतिम अकरामध्ये स्थान टिकवून ठेवण्याचा दबाव त्याच्यावर आहे असं मला वाटतं, याकडेही लक्ष्मणनं लक्ष वेधलं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35I1p4s
No comments:
Post a Comment