दुबई: भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर यांनी आपलं 'लक्ष्य' निश्चित केलं आहे. संघातील युवा खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आगामी टी-२० वर्ल्डकप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं तयारी करायची आहे, असंही ते म्हणाले. कॅरेबियन दौऱ्यावरून परतल्यानंतर शास्त्री यांनी 'गल्फ न्यूज'शी संवाद साधला. 'तुमच्याकडे टी-२० वर्ल्डकपसाठी १२ महिने आणि विश्व टेस्ट चॅम्पियनशिपसाठी जवळपास १८ ते २० महिने आहेत. ते लक्षात घेऊन तयारी करायला हवी,' असं त्यांनी सांगितलं. 'सध्या झपाट्यानं बदल होत आहेत. त्या दृष्टीनं युवा खेळाडूंवर अधिक लक्ष देणं महत्वाचं आहे. त्यामुळं अनुभवी खेळाडूंसोबत त्यांचा ताळमेळ बसून एक मजबूत संघ तयार होईल,' असं शास्त्री म्हणाले. कामगिरीत सातत्य राखणे हेच आमचं लक्ष्य आहे. युवा खेळाडूंवर लक्ष द्यावं लागेल. तसंच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीतील 'बेंच स्ट्रेंथ' मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NUuV1s
No comments:
Post a Comment