क्वीन्सलँड: ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या मार्श चषक वन डे क्रिकेट स्पर्धेत रविवारच्या सामन्यात एक गंमतीशीर प्रसंग घडला. मार्नस लाबुशेनने जीवाच्या आकांताने फिल्डिंग केली. पापणी लवायच्या आत चेंडू अडवून यष्टीरक्षकाकडे फेकला. पण या प्रयत्नात त्याची पँट मात्र खाली आली! हा प्रसंग अर्थात कॅमेऱ्यात कैद झाला. पँट घसरली असली तरी मार्नसला त्याच्या प्रयत्नाचे फळ मात्र मिळाले. त्याने ख्रिस ट्रेमेन या फलंदाजाला धावबाद केले होते. क्वीन्सलँड विरुद्ध व्हिक्टोरिया असा हा सामना रंगला होता. मार्नस हा क्वीन्सलँडचे प्रतिनिधित्व करत होता. सामन्याच्या २९ व्या षटकात फलंदाज विल सदरलँडने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मार्नसने डाइव्ह मारून तो चेंडू अडवला, पण हे करत असताना त्याची पँट घसरली. तरीही त्याने चेंडूवर लक्ष केंद्रित करत तो यष्टीरक्षकाकडे फेकला आणि ख्रिस ट्रेमेन धावबाद झाला. मार्नसच्या क्षेत्ररक्षणाला सर्वांनी दाद दिली. अॅशेस मालिकेतही त्याने जोरदार फटकेबाजी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2mXRGq6
No comments:
Post a Comment