मुंबई: गानकोकिळा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर बॉलिवूड स्टार, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महान क्रिकेटपटू यानंही लतादीदींना खास व्हिडिओ मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सचिननं हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केलीय. मास्टर-ब्लास्टर सचिननं सव्वा मिनिटाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यात लतादीदींना टॅग केलं आहे. 'लता मंगेशकर दीदी, तुम्हाला ९० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. परमेश्वरानं तुम्हाला उत्तम आरोग्य द्यावं', असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. सचिननं व्हिडिओ संदेश पाठवला असून, आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. मी लहान असल्यापासून लतादीदींची गाणी ऐकली आहेत. मी तुमचं पहिलं गाणं कधी ऐकलं हे सांगता येऊ शकत नाही हे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, असं सचिन म्हणाला. लतादीदींनी गायलेली गाणी मला प्रचंड आवडतात. त्यांचं गाणं मी ऐकलं नाही असा एकही दिवस नाही, असंही तो म्हणाला. या व्हिडिओतून त्यानं लतादीदींनी त्याच्यासाठी गायलेल्या एका गाण्याची आठवण करून दिली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहे. लता मंगेशकर ही मला देवानं दिलेली सर्वात मोठी भेट आहे असं मी म्हणेन, असंही त्यानं सांगितलं. दरम्यान, सचिन तेंडुलकर हा लतादीदींच्या गाण्यांचा प्रचंड चाहता आहे. सचिनच्या वॉकमॅनमध्ये लतादीदींच्या गाण्यांचं खास कलेक्शन असायचं. फावल्या वेळेत किंवा प्रवासात हीच गाणी तो ऐकायचा आणि मनसोक्त आनंद लुटायचा. दुसरीकडे लतादीदीही सचिनच्या प्रचंड चाहत्या आहेत. सचिनच्या फलंदाजीचं त्या नेहमी कौतुक करायच्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2lTMrr2
No comments:
Post a Comment