नवी दिल्ली: भारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू याने आपल्या लुकमध्ये किंचितसा बदल केला आहे. आतापर्यंत बियर्ड लुकमध्ये दिसणारा युवी आता क्लीन शेव्ह लुकमध्ये दिसणार आहे. युवीने आपला नव्या लुकवाला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने आपल्या या नव्या लुकला 'चिकना चमेला' असे नाव दिले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये युवीने कानांना हेडफोन लावला असून गॉगल देखील घातला आहे. आपल्या या नव्या लुकवर युवीने आपल्या चाहत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा नवा लुक कायम ठेवावा की आपल्या जुन्याच लुकमध्ये पुन्हा जावे अशी विचारणा त्याने चाहत्यांकडे केली आहे. युवराज सिंहने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, 'न्यू लुक... चिकना चमेला, की मी पुन्हा दाढी वाढवली पाहिजे...' हा फोटो पाहताच चाहत्यांना युवावस्थेतील युवराजची आठवण झाली. काही चाहत्यांनी त्याच्या या नव्या लुकची प्रशंसा केली. मात्र, टेनिस स्टार सानिया मिर्झाची प्रतिक्रिया थोडीशी वेगळी आहे. आपल्या प्रतिक्रियेसोबत सानियाने युवीला एक सल्लाही दिला आहे. भारतीय टेनिस स्टार सानियाने युवीच्या या नव्या लुकची खिल्ली उडववत सल्ला दिला आहे. ती लिहिते, 'युवी, तू पाऊट करून तुझी डबल चीन लपवण्याचा प्रयत्न करत आहेस का?. आपण यावर बोललो होतो.... पुन्हा पूर्वीसारखीच दाढी वाढव.' सानिया आणि युवराज हे जवळचे मित्र आहेत. सोशल मीडियावर युवराजची ही नवी पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. युवीचे चाहते या फोटोला लाइक देत आहेत. या सोबतच ते युवीच्या नव्या लुकवर आपली प्रतिक्रियाही देत आहेत. काही दिवसांपूर्वी एका टीव्हीवर मुलाखत देताना युवराजने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला उजाळा दिला होता. युवराज सिंहला मर्यादित संधीं मिळाल्या आहेत. मात्र त्याने या संधींचे सोने करत चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. मात्र २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत युवराजला संधी मिळू शकली नाही. त्याने निवड समितीतीस सदस्यांच्या दृष्टीकोनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यो-यो चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर आपली संघात निवड होईल, असे आपल्याला सांगण्यात आले होते, मात्र असे झाले नाही असे युवराजने म्हटले होते. संघाच्या व्यवस्थापनाने जर आपल्याला मदत केली असती तर मी आणखी एक विश्वचषक खेळू शकलो असतो, असेही तो म्हणाला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2nPirNi
No comments:
Post a Comment