नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर हिनं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात तिनं ६१ चेंडूंत ११३ धावांची स्फोटक खेळी केली. त्यात तिनं तब्बल २० खणखणीत चौकार लगावले. टी-२०मधील हा विश्वविक्रम आहे. बेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियानं २० षटकांत चार गडी गमावून २१७ धावांचा डोंगर उभा केला. तिनं अवघ्या ५४ चेंडूंत शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे या शतकी खेळीत तिनं एकही षटकार लगावला नाही. ऑस्ट्रेलियाचं हे तगडं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला फक्त १७६ धावाच करता आल्या. कर्णधार सी. अटापट्टूनं ११३ धावांची खेळी केली, मात्र संघाला विजय मिळू शकला नाही. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मुनीनं स्वतःचा विक्रम मोडीत काढला. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध २०१७मध्ये १९ चौकार ठोकले होते. सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची मॅट लेनिंग दुसऱ्या स्थानी आहे. तिनं आयर्लंडविरुद्ध १८ चौकार तडकावले होते. विशेष म्हणजे मुनीनं या शतकी खेळीत एकही षटकार लगावला नाही. हा सुद्धा एक विक्रमच म्हणावा लागेल. ती टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकही षटकार न मारता शतक झळकावणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. तसंच मुनीचं हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं शतक आहे. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध ७० चेंडूंमध्ये १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ११७ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, श्रीलंकेला या सामन्यात ४१ धावांनी पराभूत व्हावं लागलं. २० षटकांत त्यांनी ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. कर्णधार सी. अटापट्टूनं जबरदस्त शतकी खेळी केली. तिनं ६६ चेंडूंत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं ११३ धावांची झंझावाती खेळी केली. अन्य फलंदाजांची तिला साथ मिळाली नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2nELcfA
No comments:
Post a Comment