विजयनगरम: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सराव सामन्यात भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हनकडून सलामीला उतरलेला खाते न उघडताच बाद झाला. तीन दिवसीय सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी रोहित फक्त दोनच चेंडू खेळू शकला. के. एल. राहुलच्या खराब कामगिरीमुळं २ ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेत रोहित शर्माला सलामीला उतरवण्याची तयारी भारतीय संघ व्यवस्थापनानं केली आहे. त्यानुसार सराव सामन्यात रोहित शर्मानं भारतीय डावाची सुरुवात केली. पण शून्यावरच तो बाद झाला. त्याला फक्त दोनच चेंडू खेळता आले. मयांक अग्रवालसोबत तो सलामीला उतरला होता. वेगवान गोलंदाज वर्नोन फिलेंडर यानं त्याला यष्टिरक्षककरवी झेलबाद केलं. मर्यादित षटकांच्या सामन्यात सलामीला येणाऱ्या रोहितनं कसोटी सामन्यांत मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. मात्र, के. एल. राहुल अपयशी ठरल्यानं दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहितला सलामीला खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. रोहित आतापर्यंत २७ कसोटी सामने खेळला आहे. त्यात एकूण १५८५ धावा केल्या आहेत. त्यात तीन शतके आणि दहा अर्धशतके आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित पहिल्यांदाच लाल चेंडूवर डावाची सुरुवात करणार आहे. त्याआधी सराव सामन्यात सलामीला उतरलेला रोहित डावाची सुरुवात चांगली करील अशी अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा फोल ठरली असून तो शून्यावर बाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2noYuwU
No comments:
Post a Comment