चेन्नई: मी वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये करू शकतो, असे सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या सुरेश रैनाने म्हटले आहे. रैना गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शेवटचा सामना खेळला होता. सध्या तो टी-२० विश्वचषकापूर्वी संघाच पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. सन २०२० आणि २०२१ मध्ये दोन टी-२० विश्वकप स्पर्धा होणार आहे. रैनाचे हे मत 'द हिंदू' वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. या यापूर्वी चौथ्या स्थानावर फलंदाजी केली असून चांगली कामगिरी करून दाखवल्याचे रैनाने म्हटले आहे. टी-२० चे दोन विश्वचषक स्पर्धा होणार असून आपण संधीच्या शोधात असल्याचे रैनाने म्हटले आहे. भारतीय संघातील क्रमांक ४ हे स्थान दीर्घ काळापासून चर्चेचा विषय राहिलेला आहे. अम्बटी रायुडूला चौथ्या स्थानी खेळवल्यानंतर निवडकर्त्यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी विजय शंकरची निवड केली. शंकर जायबंदी झाल्यानंतर ऋषभ पंतला या स्थानी खेळण्याची संधी देण्यात येत आहे. मात्र त्यांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऋषभबाबत रैनानेही आपले मत व्यक्त केले आहे. ऋषभ काहीसा गोंधळलेला दिसतो. याच कारणामुळे तो आपला नैसर्गिक खेळ खेळताना दिसत नाही. तो नेहमीच सिंगलच्या शोधात असतो. तो चेंडू अडवतो मात्र त्यानंतर असे वाटते की त्याला स्थितीचे फारसे आकलन होच नाही, असे मत रैनाने व्यक्त केले आहे. महेंद्रसिंह धोनी ज्या प्रकारे खेळाडूंशी बोलतो, त्याच प्रमाणे कुणीतरी ऋषभशी बोलण्याची आवश्यकता आहे, असेही रैना म्हणाला. हा एक मानसिक खेळ आहे. ऋषभला समर्थनाची आवश्यकता असून त्यामुळे तो आपला आक्रमक खेळ खेळू शकतो, असेही रैना म्हणाला. सध्या तो सूचनांनुसार खेळत आहे असे वाटते. आणि निर्देशांमुळे त्याचा नैसर्गिक खेळ दिसत नाही असे वाटते, असे रैना म्हणाला. धोनी आताही संघासाठी बरेच काही करू शकतो असे रैनाला वाटते. तो आजही फिट आहे. धोनी एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. शिवाय तो खेळाचा सर्वात मोठा फिनिशरही आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत धोनी भारतासाठी महत्त्वाचा सिद्ध होईल, असे मत रैनाने व्यक्त केले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2m2jJV2
No comments:
Post a Comment