मुंबई: फलंदाज आणि विकेटकीपर बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. लवकरच त्याला टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंतऐवजी साहाला संधी देण्याचा विचार सुरू आहे. तसे संकेत व्यवस्थापनाकडून मिळत आहेत. साहाला अनुभव आणि यष्टीरक्षण कौशल्यामुळं टीम इंडियात पुन्हा जागा मिळू शकते. भारतीय मैदानांवरील खेळपट्ट्यांवर चेंडू उसळल्यानंतर टर्न घेतो. अशी परिस्थिती साहा चांगल्या पद्धतीनं हाताळतो. कसोटी मालिकेसाठी संघात रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनला स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. तर साहा हा उत्तम पर्याय आहे, असं मानलं जात आहे. गेल्या १८ महिन्यांपासून साहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकला नाही. साहाच्या अनुपस्थितीत संघानं अनेक विकेटकीपरना संधी दिली. साहानं भारताकडून ३२ कसोटी सामने खेळले आहेत. २०१८ मध्ये दुखापतीच्या कारणांमुळं त्याला खेळता आलं नाही. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार, 'सर्वोत्तम विकेटकीपरची निवड करण्याच्या उद्देशानं संघात दोन विकेटकीपर खेळवण्यात येत आहेत. रिषभ पंतची निराशाजनक कामगिरी सुद्धा साहाच्या पथ्यावर पडू शकते. वेस्ट इंडीज दौऱ्यात पंत अपयशी ठरला. तसंच डीआरएसचे निर्णयही त्याचे अनेकदा चुकीचे ठरले.' त्यामुळं आता पंतऐवजी साहाला पुन्हा संधी मिळणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2lQqqco
No comments:
Post a Comment