मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून खराब कामगिरीमुळं टीकेचा धनी ठरलेला टीम इंडियातील युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंतची मुख्य प्रशिक्षक यांनी पाठराखण केली आहे. हा वर्ल्ड क्लास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो यशस्वी व्हावा यासाठी संघ व्यवस्थापनाचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. टीम इंडियात रिषभ पंतची निवड झाल्यानंतर सर्वच स्तरांतून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, वेस्ट इंडीज दौऱ्यात तो अपयशी ठरला. त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. त्यामुळं सध्या त्याच्यावर टीका होत आहे. मात्र, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याची पाठराखण केली आहे. युवा फलंदाज रिषभ पंत हा वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळावा, यासाठी संघ व्यवस्थापन त्याच्या कायम पाठिशी उभं राहील, असे ते म्हणाले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री बोलत होते. पंत एक वर्ल्ड क्लास खेळाडू आणि मॅचविनर आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटबाबत म्हणाल तर, जगात पंतसारखे खेळाडू खूप कमी आहेत. हाताच्या बोटांवरही त्याला मोजता येणार नाही, असं उदाहरण देत त्यांनी पंतचं कौतुक केलं. सर्व प्रसारमाध्यमे आणि क्रिकेट विश्लेषक त्याच्याविषयी लिहतात. मात्र, सध्याच्या घडीला त्याच्यासोबत आहे. विश्लेषक बोलू शकतात, ते त्यांचे काम आहे. पण पंत हा एक खास खेळाडू आहे. त्यानं आधीच ते सिद्ध केलेलं आहे. यापुढे त्याला फक्त शिकायचं आहे. संघ व्यवस्थापन अखेरपर्यंत त्याच्यासोबत राहील, असंही ते म्हणाले. दरम्यान, याआधीही रवी शास्त्री यांनी पंतला विशेष सल्ला दिला होता. पंतनं अधिक जबाबदारीनं खेळायला हवं, असं ते म्हणाले होते. त्यावर संघ व्यवस्थापन आणि पंतच्या कामगिरीमुळं मी त्याला हा सल्ला दिला होता, असं तुम्ही म्हणू शकत नाही. जर कुणी चुकत असेल तर त्याच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले. मी काय केवळ तबला वाजवण्यासाठी जात नाही. तो एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. कोणत्याही गोलंदाजांना फोडून काढण्याची त्याच्यात क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं सर्वोत्तम योगदान द्यावं यासाठी त्याला पाठिंबा द्यावाच लागेल, असंही रवी शास्त्री म्हणाले. एकीकडे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतची पाठराखण केली असली तरी, दुसरीकडे आगामी कसोटी मालिकेत पंतऐवजी वृद्धिमान साहाला संधी देण्याचा विचार सुरू असल्याचं कळतं. तसे संकेत संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यात रिषभ पंतला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही पंतची जादू चालली नाही. विकेटकीपर आणि फलंदाजीत त्याला कमाल करता आली नाही. कामगिरीत सातत्य नसल्यानं त्याच्यावर कमालीचा दबाव वाढला आहे. त्यात आता पंतऐवजी साहाला संधी देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळं आगामी कसोटी मालिकेत आता पंतला कायम ठेवतात की, साहाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2mPj8py
No comments:
Post a Comment