नवी दिल्ली भारत आणि द. आफ्रिकेदरम्यान कसोटी मालिकेला विशाखापट्टणम टेस्टपासून सुरूवात होणार आहे. हा सामना डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट मैदानावर बुधवारपासून सुरू होत आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार विराट कोहलीवर असणार. कोहलीने घरच्या मैदानावर जोरदार विक्रम केले आहेत. त्याचा रनरेट सरासरी ६४,६८ आहे. विराटने घरच्या मैदानांवर एकूण ३४ कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण ३१०५ धावा बनवल्या आहेत. या दरम्यान त्याच्या नावावर एकूण ११ शतक नोंदवले गेले आहेत. घरच्या मैदानावर कमीत कमी ३,००० धावा कुटणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये कोहलीची सरासरी सर्वात चांगली आहे. अन्य देशांच्या फलंदाजांबाबत सांगायचं तर जागतिक विक्रम डॉन ब्रॅडमनच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनने ३३ कसोटी सामन्यांमध्ये ९८.२२ च्या सरासरीने ४,३२२ धावा केल्या आहेत. त्यांच्या नावे १८ शतकांची देखील नोंद आहे. स्मिथ दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचाच स्टीव स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. त्याने २९ कसोटी सामन्यांमध्ये ३,०७५ धावा केल्या आहेत. त्याचा रनरेट ७७.२५ आहे. गॅरी सोबर्स तिसऱ्या स्थानी आहे. या कॅरेबियन महान फलंदाजाने घरच्या मैदानांवर ४४ कसोटी सामने खेळले आहेत आणि ६६.८० च्या सरासरीने ४,०७५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १४ शतकांची नोंद आहे. पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद युसूफने ३२ कसोटी खेळून ६५.२५ च्या सरासरीने ३,०६७ धावा केल्या आहेत. यात १२ शतकांचा समावेश आहे. तो चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानावर भारतीय कर्णधार आहे. तसं पाहिलं तर टॉप-५ मध्ये समावेश असलेल्या फलंदाजांमध्ये विराटकडे घरच्या मैदानावरील आपला स्कोर वाढवण्याची संधी आहे, कारण या टॉप पाच पैकी विराट वगळता बाकीच्या फलंदाजांनी निवृत्ती घेतली आहे. विराटनंतर पुजाराचा क्रमांक भारतीय फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे मधल्या फळीतला दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा. पुजाराने देशात ३६ कसोटी सामने खेळले आहेत आणि ३,२१७ धावा बनवल्या आहेत. यात १० शतकांचाही समावेश आहे. त्याचा रनरेट ६१.८६ चा आहे. ओवरऑल फलंदाजांमध्ये त्याचा क्रमांक सातवा आहे. मायकल क्लार्क सहाव्या स्थानी आहे. क्लार्क ने आपल्या देशात ऑस्ट्रेलियात एकूण ५३ कसोटी सामने खेळले आहेत. त्याचा रनरेट ६२.०५ आहे. त्याने ४,६५४ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये १७ शतक बनवले आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2oIF9aq
No comments:
Post a Comment