Ads

Monday, March 23, 2020

करोनाविरुद्ध लढ्यासाठी क्रिकेटपटूचे रॅप साँग!

नवी दिल्ली: करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. जवळपास १४ तास नागरिक घरीच राहिले. या काळात अनेक खेळाडूंनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. गेल्या काही दिवासांपासून भारतीय क्रिकेटपटू करोना विरुद्धच्या लढ्यासाठी सोशल मीडियावरून आवाहन करत आहेत. याच सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेकांचा समावेश होता. आता भारताच्या एका क्रिकेटपटूने करोनाविरुद्धच्या लढ्यावर एक गाणं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- भारतीय संघातील सलामीवीर गब्बर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या याने ट्वीटवर १७ सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. धवनने करोनाविरुद्धच्या लढ्यासाटी एक रॅप गाणं म्हटले आहे. वाचा- अशा आहेत गाण्याचा ओळी... 'कोरोना को कर देंगे हम चीर बंदे। हिंदुस्तानियों को यह पूरा यकीन बंदे। बैठ जाओ तुम भी घर पर सभी के साथ। फैला देंगे फिर से हम खुशियों के राज।' वाचा- जनता कर्फ्यू झाल्यानंतर देखील दिल्लीसह १७ राज्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सर्व सामान्य नारिकांसह सर्व क्रिकेटपटू आणि अन्य खेळाडू घरी राहून करोनाविरुद्ध लढण्याचे आवाहन करत आहेत. वाचा- हे देखील-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/33JifAb

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...