चेन्नई: भारताचा माजी कर्णधार आयपीएलच्या तयारीला लागला आहे. चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर धोनी सराव करत आहे. चेन्नई संघाचा सराव पाहण्यासाठी चाहते देखील येत आहेत. या सराव सत्राचा एक व्हिडिओ चेन्नई संघाने शेअर केला आहे. या व्हिडिओतून धोनीचा दमदार पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे दिसते. चेन्नई सुपर किंग्जने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनी बॅटिंगच्या सरावासाठी येतो. धोनी येताच मैदानातील चाहत्यांनी त्याला चीअर करण्यास सुरूवात केली. त्यानंतर धोनीने शानदार शॉट देखील खेळले. धोनी मारलेला चेंडू थेट सीमेच्या पलिकडे गेला. धोनीचा हा षटकार पाहिल्यानंतर चाहत्यांनी आणखी जल्लोष करण्यास सुरुवात केली. त्याआधी धोनी चेन्नई स्टेडियमवर पोहोचला तेव्हा चाहत्यांनी त्याचे धमाकेदार स्वागत केले. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी दोन आठवडे सराव सत्रात भाग घेणार आहे. त्यानंतर तो ४-५ दिवसांची सुट्टी घेईल आणि आयपीएल सुरू होण्याआधी पुन्हा एकदा परत येईल. धोनीसह अंबाती रायडू, मोनू सिंह, पियूष चावला, सुरेश रैना यांनी देखील सराव सत्रात भाग घेतला. सराव सत्राआधी धोनीने जिम वर्कआऊट केले. ३८ वर्षीय धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९च्या वर्ल्डनंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38hS0Sb
No comments:
Post a Comment