नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार गेल्या काही दिवसांपासून धावा करण्यात अपयशी ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत विराटने खराब कामगिरी केली. वनडे मालिके पाठोपाठ कसोटी मालिकेत झालेल्या पराभवामुळे विराटवर टीका केली जात आहे. अशातच पाकिस्तानच्या एका माजी कर्णधाराने विराट बद्दल काळजी करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटने २,१९,३ आणि १४ अशा मिळून ३८ धावा केल्या. यावर बोलताना पाकिस्तानचा माजी कर्णधार म्हणाला, अनेक जण विराटच्या फॉर्मबद्दल चर्चा करत आहेत. पण मला कळत नाही ज्या पद्धतीने विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतक केली आहेत. त्यावर तुम्ही असे प्रश्न कसे काय उपस्थित करू शकता. वाचा- प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी वेळ येते. प्रयत्न करून देखील धावा करता येत नाहीत. भारतीय संघाचीच कामगिरी खराब होत आहे. कोहली धावा करू शकला नाही तर अन्य खेळाडूंचे काय? हा खेळाचा एक भाग आहे तो मान्य केला पाहिजे, असे इंझमाम म्हणाला. वाचा- विराटच्या फॉर्मबद्दल काळजी करण्याचे कारण नाही. ही वेळ देखील निघून जाईल. विराटने याआधी जसा खेळ केला त्यात बदल करू नये. तो मानसिकदृष्ट्या मजबूत आहे. त्याने काळजी करू नये. विराट नक्कीच कमबॅक करेल, असे इंझमामने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2uNVEWh
No comments:
Post a Comment