मुंबई: क्रिकेटसह क्रीडा क्षेत्रात करोना व्हायरसमुळे शांतता आहे. क्रीडा स्पर्धाच बंद असल्यामुळे चाहत्यांना क्रीडा विश्वातील सामन्यांचा आनंद घेता येत नाही. भारतात करोनाविरुद्ध २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. क्रिकेटमध्ये सामने होत नसले तरी या निमित्ताने काही विक्रमांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आज जाणून घेऊयात अशाच एका विक्रमाची जो फक्त दोघा भारतीय क्रिकेटपटूंना करता आला आहे. वाचा- भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावस्कर, कपील देवपासून ते सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीपर्यंत अनेक खेळाडूंच्या नावावर आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत. पण आज आम्ही जो विक्रम तुम्हाला सांगणार आहोत तो फक्त दोघा भारतीय क्रिकेटपटूंना करता आला आहे. जागतिक क्रिकेटमधील अन्य कोणत्याही दिग्गज क्रिकेटपटूला जमले नाही ते भारतीयांनी करून दाखवले आहे. वाचा- भारताचा सलामीवीर आणि कर्णधार या दोघांच्या नावावर एक संयुक्त विक्रम आहे. हिटमॅन रोहित आणि रनमशीन विराट हे एकमेव असे फलंदाज आहेत ज्यांना आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये किमान एकदा तरी मिळाला आहे. रोहित आणि विराट शिवाय अन्य कोणाला अशी कामगिरी करता आली नाही. आयसीसी वर्ल्ड कप, टी-२० वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या चार मुख्य स्पर्धांमध्ये किमान एकदा तरी या दोघांनी सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. वाचा- रोहित शर्मा- रोहितने आयसीसी वर्ल्ड कप २०१५ मध्ये एकदा तर २०१९ मध्ये ४ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. २०१६च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दोन वेळा, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत २०१७ मध्ये एकदा तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन वेळा हिटमॅनने सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. वाचा- विराट कोहली- विराटला आयसीसी वर्ल्ड कप २०१५ आणि २०१९ मध्ये प्रत्येकी एक वेळा, २००९ मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत एक वेळा, तर आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ५ वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटला एकदा सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हे देखील वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WLcsbS
No comments:
Post a Comment