नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्धची लढाई जिंकायची असेल तर घरात राहणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. काही जण लॉकडाऊन असताना देखील घराबाहेर पडत आहेत. त्यांना घरी पाठवण्याचे काम पोलिस आणि अन्य सुरक्षा कर्मचारी करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू सोशल मीडियावरून लोकांना वारंवार आवाहन करत आहेत. अशातच पोलिसांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक फोटो वापर करून लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. वाचा- गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या सामन्यात धोनी धावबाद झाला होता. धोनीच्या हा धावाबाद होतानाचा व्हिडिओ उत्तर प्रदेश पोलिसांनी वापरला आहे. हा फोटो शेअर करताना पोलिस म्हणतात, वाचा- हमें कोरोना से मैच जीतना है!कैसे?अंदर रहकर धोनीच्या या फोटोवर पोलिसांनी लिहले आहे की, उस दिन भी यही ख्याल आया था कि काश अंदर होते। वाचा- श्न जगभरातील वेगाने पसरत आहे. भारतातील रुग्णांची संख्या ६००वर पोहोचली आहे. तर यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २० हजारच्या वर गेली आहे. चीन, इटली, स्पेन आणि आता अमेरिक सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कालच भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने लॉकडाऊन असताना लोक बाहेर येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सचिनने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, सरकार आणि डॉक्टर सर्वांना घरी राहण्यास सांगत आहेत. तरी मी असे ऐकतोय की काही लोक ही गोष्ट गंभिर्याने घेत नाहीत. यासंदर्भातील काही व्हिडिओ देखील मी पाहिले ज्यात काही जण क्रिकेट खेळत आहेत. सर्वांना या काळात खेळण्याची आणि मित्रांना भेटण्याची इच्छा होत असेल. पण ही गोष्ट देशासाठी प्रचंड धोक्याची आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सुट्टी समजण्याची चुक तुम्ही करू नये. वाचा- ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण सर्व जण ऑक्सिजन आहोत आणि करोना व्हायरस ही आग आहे. या व्हायरसला पसरण्यापासून रोखायचे असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे या आगीच्या जवळ ऑक्सिजन पोहोचू द्यायचा नाही. याचा दुसरा अर्थ असा की घरातून बाहेर पडायचे नाही. करोनाविरुद्धच्या लढाईत जे लोक प्रत्यक्षात मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. मी आणि माझे कुटुंबीय गेल्या १० दिवसांपासून कोणालाही भेटलेलो नाही आणि पुढील २१ दिवस आणि कोणालाही भेटणार नाही. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची हाच एक सर्वोत्तम काळ आहे. नियमांचे पालन करा आणि आपल्या समाजाला, देशाला आणि संपूर्ण जगाला या व्हायरसपासून वाचवा. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी त्याला पाठिंबा दिला होता. यात विरट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पिटरसन यांचा समावेश होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bsB2Cq
No comments:
Post a Comment