ऑकलंड: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघाचा २२ धावांनी पराभव झाला आणि त्यामुळे भारताने मालिका देखील २-०ने गमावली. भारतीय संघाला जरी या सामन्यात विजय मिळवता आला नसला तरी अष्ठपैलू रविंद्र जडेजाने एक शानदार खेळी केली आणि अखेरपर्यंत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला. जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि या दिग्गजांना मागे टाकले. ऑकलंड येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत जडेजाने सातव्या क्रमांकावर येत ७३ चेंडूत ५५ धावा केल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ४९व्या षटकात तो बाद झाला पण न्यूझीलंडला त्याने सहज विजय मिळून दिला नाही. वाचा- जडेजाने वनडे क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सातवे अर्धशतक झळकावले. यासह भारताकडून या क्रमांकावर फलंदाजी करत सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम जडेजाने स्वत:च्या नावावर केला. याआधी भारताकडून सातव्या क्रमांकावर सर्वाधिक अर्धशतक करण्याचा विक्रम धोनी आणि कपिल देव यांच्या नावावर होता. वाचा- धोनी आणि कपिल देव यांनी सातव्या क्रमांकावर प्रत्येकी ६ अर्धशतक केली होती. जडेजाने या दोघांनाही मागे टाकत सातवे अर्धशतक केले. त्याने सहाव्या विकेटसाठी श्रेयस अय्यर सोबत ३३, सातव्या विकेटसाठी शार्दुल ठाकूर सोबत २४, आठव्या विकेटसाठी नवदीप सैनीसह ७६ धावांची आणि नवव्या विकेटसाठी चहलसोबत २२ धावांची भागिदारी केली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2uzp5ez
No comments:
Post a Comment