Ads

Wednesday, February 5, 2020

श्रेयस अय्यरचं वन डेतील पहिलं शतक

हॅमिल्टन: न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या वन डे सामन्यात टीम इंडियासाठी चौथ्या स्थानावर आलेल्या () १०३ धावा ठोकत एकदिवसीय मालिकेतील त्याचं पहिलं शतक साकारलं. श्रेयसच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडला ३४८ धावांचं आव्हान दिलं आहे. श्रेयसनं अवघ्या १०१ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं एक दिवसीय सामन्यातील पहिलं शतक ठोकलं आहे. १०३ धावांवर श्रेयस बाद झाला. श्रेयसच्या या खेळीनं चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला असल्याचं म्हटलं जात आहे. टी-20 मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना हॅमिल्टनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार टॉम लाथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं ५० ओव्हरमध्ये चार विकेट्स गमावून ३४७ धावांचा डोंगर उभा केला आहे. यजमान संघाला पहिला वनडे जिंकण्यासाठी ३४८ धावांचे लक्ष्य दिलं आहे. विराट आणि राहुल यांचं अर्धशतकविराटनं ६३ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकी खेळी. विराटचं त्याच्या कारकिर्दीतलं हे ५७वं अर्धशतक ठरलं तर लोकेश राहुलनं ६४ चेंडूत ८८ धावा कुटल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/375f0U0

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...