Ads

Thursday, February 20, 2020

अजिंक्यने टोचले ऋषभ पंतचे कान; दिला महत्त्वाचा सल्ला

वेलिंग्टन: भारतीय संघातील यष्टीरक्षक त्याच्या खराब कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात संधी न मिळालेल्या पंतचे कसोटी संघाचा उपकर्णधार याने कान टोचले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याआधी एका पत्रकार परिषदेत अजिंक्यने पंतसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. वाचा- पंतने लवकरात लवकर ही गोष्ट स्विकारली पाहिजे की तो खराब काळातून जात आहे. त्याला फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. पाच महिन्यांपूर्वी पंत भारतीय संघाचा तिनही यष्टीरक्षक होता. पण कसोटीत वृद्दीमान साहाने त्याची जागा घेतली. तर वनडे आणि टी-२० मध्ये केएल राहुलला ही जबाबदारी सोपवण्यात आली. पंतला अनेक संधी दिल्यानंतर देखील त्याने त्याचा फायदा घेतला नाही आणि त्यात खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसावे लागले. वाचा- पंत संदर्भात बोलताना अजिंक्य म्हणाला, तुम्ही कोणत्या अवस्थेतून जात आहात हे समजून घेणे आणि त्याचा स्विकार करणे फार गरजेचे असते. सकारात्मक राहिले पाहिजे. अन्य खेळाडूंपासून मग ते ज्युनिअर असो की सिनिअर त्यांच्यापासून अधिक शिकले पाहिजे. कोणत्याही खेळाडूला वाटत नाही की त्याने संघाबाहेर रहावे. पण जेव्हा संघाला तुमच्याकडून काही खास सामन्यात अपेक्षा असते तेव्हा ती पूर्ण करण्याची जबाबदारी देखील तुमचीच असते. मेहनत करून एक क्रिकेटपटू म्हणून स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करावी, असे अजिंक्य म्हणाला. वाचा- जेव्हा पंतला सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जात असेल तर त्याला हा विचार करावा लागेल की संघ काय अपेक्षा करतोय. २०१८ मध्ये अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून वगळण्यात आले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P9l8nX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...